आर्थिकताज्या बातम्या

रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! महिन्याचे धान्य ह्याच तारखेपर्यंत घेता येणार…

राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक जारी केले असून, यातून धान्य वाचून धान्याचा काळाबाजार रोखता येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रेशन दुकानांमधून वितरित केले जाणारे धान्य यापूर्वी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत घेण्याची मुभा होती; मात्र आता त्या महिन्याचे धान्य त्याच महिन्याच्या अखेरपर्यंतच घ्यावे लागणार आहे.

राज्य सरकारने याबाबतचे परिपत्रक जारी केले असून, यातून धान्य वाचून धान्याचा काळाबाजार रोखता येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिकाधारकांना २ किलो गहू व ३ किलो तांदूळ प्रति व्यक्ती दिले जाते. लाभार्थीना महिन्याकाठी दिले जाणारे धान्य काही अपरिहार्य कारणास्तव न घेतल्यास पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत घेण्याची मुभा देण्यात आली होती.

Advertisement

त्यामुळे पुढील महिन्यात धान्य घेतल्यास मागील महिन्याचे व पुढील महिन्याचे असे दोनवेळचे धान्य संबंधित लाभार्थीला देण्यात येत होते.

त्यामुळे पुरवठा विभागाला गेल्या महिन्याचे शिल्लक राहिलेले धान्य अधिक पुढील महिन्याचा कोटा संबंधित रेशन दुकानदारांना द्यावा लागत होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर शिल्लक धान्याची आकडेमोड करावी लागत होती. याचा गैरफायदा अनेक रेशन दुकानदार घेत होते.

शिल्लक प्रत्यक्ष लाभार्थीना धान्य वितरित करण्याऐवजी खुल्या बाजारात त्याची विक्री केली जात होती. त्याचप्रमाणे या शिल्लक धान्याचे वितरण करणे बंधनकारक असल्याने संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी यांना याचा हिशोब व ताळमेळ ठेवण्यातही अडचण निर्माण होत होती.

Advertisement

‘शिल्लक धान्यांचा प्रश्न निकाली’

■ सप्टेंबरपासून राज्यात सप्टेंबरचे धान्य सप्टेंबरमध्येच वितरित करावे, शिल्लक राहिलेले धान्य पुढील महिन्याच्या कोट्यातून कमी करून उरलेला कोटा रेशन दुकानदारांना देण्याचा निर्णय अमलात आणण्यात आला आहे. परिणामी राज्य सरकारचे धान्य वितरणातील धान्य वितरणात आर्थिक बचत होत आहे.

■ जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा होळकर म्हणाल्या, पुणे जिल्ह्याने या निर्णयावर ठाम राहिल्याने अन्य जिल्ह्यांनी देखील करी फॉरवर्ड अर्थात गेल्या महिन्याचा शिल्लक राहिलेला कोटा वगळून पुढील महिन्याचे धान्य मिळावे असा आग्रह धरल्यामुळे शिल्लक धान्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यामुळे संबंधित महिन्याचे वितरण वाढून ग्राहकांनाही त्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेऊन जाण्याची सवय लागेल.”

Advertisement

अंमलबजावणी तातडीने…..

यासंदर्भात राज्य स्तरावर झालेल्या ऑनलाईन बैठकीत मागील महिन्याचे धान्य पुढील महिन्यात देण्यासंदर्भातील निर्णयाबाबत पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी व पुणे जिल्हा पुरवठा अधिकायांनी अशा स्वरुपाचे धान्य त्याच महिन्यात वितरित करण्याचे बंधन असावे, असा मुद्दा मांडला.

पुढील महिन्यात त्याच महिन्याचे धान्य वितरित करण्यात यावे, जेणेकरून गेल्या महिन्याचा कोटा लक्षात घेऊन पुढील महिन्याचा धान्य कोटा संबंधित रेशन दुकानदारांना देता येईल व तेवढेच धान्य राज्य सरकारकडून उचलता येईल,

Advertisement

यामुळे रेशनवरील धान्याचा होणारा काळाबाजार रोखता येईल, असा होरा या अधिकायांनी बोलून दाखवला. या प्रस्तावाला राज्यातील अन्य जिल्ह्यानीही प्रतिसाद दिला. त्यामुळे राज्य सरकारनेदेखील या प्रस्तावाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे ठरविले.

■शिल्लक धान्याचा काळाबाजार काही दुकानदार करत होते त्याला या पद्धतीमुळे आळा बसणार आहे तसेच शिल्लक धान्याचा हिशोब ठेवण्यातही आता अडचण येणार नाही.

  • अहमदनगर ब्रेकिंग न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
  • अहमदनगरच्या आणखी बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
  • तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि ट्विटर वर फॉलो करा

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button