Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरश्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता येथील बाजार समितीत कांदा खरेदी...

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : आता येथील बाजार समितीत कांदा खरेदी सुरू

Ahmednagar News : श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा खरेदीची माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

कृषी उत्पन्न बाजार समिती हा कृषी अर्थकारणाचा कणा मानला जातो, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल नेणाऱ्या शेतकऱ्यासाठी विविध सुविधांची निर्मिती करणार असल्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.

तसेच बाजार समितीच्या आवारात शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या आवारात निवासाची सोय करण्यात येऊन बाजार समितीच्या माध्यमातून मोफत भोजनाची व्यवस्था करणार असल्याची माहिती देत.

बाजार समितीच्या आवारात कांदा उघड्यावर पडत असल्याने सेल हॉलची उभारणी करण्यात येणार असून, बाजार समिती परिसरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार,

विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाचे वजन करण्यासाठी वजन काट्याची उभारणी करणार असल्याचे सांगितले.

या वेळी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी विक्री सुरू केल्याने शेतकऱ्यांनी माजी आ. राहुल जगताप यांच्यासह बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे तसेच सर्व संचालकांचा सन्मान केला.

सोमवारी बाजार समितीमध्ये १० हजार गोण्या गुलाबी कांद्याची विक्रमी आवक होऊन १८०० ते २१०० रुपये बाजार देऊन शेतकऱ्यांना रोख पेमेंट केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.

यावेळी संचालक, व्यापारी, शेतकरी बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments