अहमदनगर

Ahmednagar Jobs : अहमदनगर जिल्ह्यातील तरुणांसाठी महत्वाची बातमी ! नोकरी पाहिजे असेल तर हे वाचाच

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे सोमवार, ११ जूलै २०२२ रोजी अॅप्रेंटीसशीप (आंतरवासिता) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आयटीआय (सर्व ट्रेड) व इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करावी.

असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविकुमार पतंम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. अहमदनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आणि मुलभूत प्रशिक्षण व अनुषंगिक सूचना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तरूणांना विविध क्षेत्रात नव्याने निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यामागील उद्देश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील १५-२० नामांकित कंपन्याचे उद्योजक सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत.

इच्छुक आयटीआय (सर्व ट्रेड) व इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in , https://www.apprenticeshipindia.gov.in , https://dgt.govt.in/appmela2022 या वेबसाईटवर किंवा https://forms.gle/Jv6RDpQaSm3eQnAT6 या लिंकवर आपली नांव नोंदणी करून पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे.

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा रोजगार मेळावा समन्वयक श् सतिश काळे (९६५७२९२७३५)व मोहसिन तांबोळी (९६२३६५३७६१) यांच्याशी संपर्क साधावा. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन आवश्यक कागदपत्रांसह रोजगार मेळाव्यास स्वतः उपस्थित रहावे. असे आवाहनही रविकुमार पतंम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button