बाजारभाव

राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra farmers news :- 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 10 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. मात्र, या दरम्यानही केवळ खाते क्रमांक हाच एकमेव पर्याय होता.

त्यामुळे 6 लाख शेतकरी हे योजनेपासून वंचित राहिलेले आहेत. आता आधार क्रमांकचा वापर करुन हप्ता जमा करण्याच्या नव्या पर्यायाचा वापर हा 11 हप्ता जमा करण्यापूर्वी केला जाणार आहे.

‘(PM Kisan Sanman Yojna) पीएम किसान योजनेमध्ये अमूलाग्र आणि परिणामकारक असे बदल होत आहेत. योजनेचा लाभ आणि शेतकऱ्यांना ऐन वेळी समस्या निर्माण होऊ नये यासाठी गावस्तरावर आता कॅम्पचे आयोजन करुन प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत.

यासंबंधी निर्णय होताच राज्यातील (Agricultural Department) कृषी विभागाच्या धोरणामुळे तब्बल 6 लाख शेतकऱ्यांची गैरसोय ही दूर होणार आहे. योजनेचा हप्ता बॅंकेत जमा होण्यासाठी आतापर्यंत केवळ (Bank Account) बॅंक खातेच ग्राह्य धरले जात होते पण आता कृषी विभागाच्या सूचनेप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही आधार क्रमांकाशी जोडण्यात आली आहे.

त्यामुळे खातेक्रमांकाचा काही संबंध न येता हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार असून आगामी हप्त्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.

कृषी विभागाने आता केवळ खाते क्रमांकच नाही तर आधारचाही पर्याय खुला केला आहे. आतापर्यंत केवळ खाते क्रमांक हाच पर्याय असल्याने राज्यातील तब्बल 6 लाख शेतकऱ्यांची गैरसोय झाली होती.

मात्र, आता आधारचा पर्याय खुला केल्याने खाते क्रमांकाबाबत अडचण निर्माण झाल्यास बॅंकेकडून रक्कम वर्ग करण्यास नकार दिला जात होता. पण बॅंक खात्याला आधारचा पर्याय खुला करावा अशी मागणी कृषी विभागाने केंद्राकडे केली होती. त्याला मंजूरी मिळाली असल्याने हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बॅंकांकडून खाते क्रमांकच्याबाबतीत विविध कारणे सांगून हप्ता रक्कम ही जमा केली जात नव्हती. यामध्ये आयएफसी कोड बदलला, सर्व्हर डाऊन झाले, बॅंक खाते अॅक्टीव नाही, खाते बंद झाले अशी कारणे शेतकऱ्यांना सांगितली जात होती.

त्यामुळे 6 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे ही दुरुस्ती करणे गरजेचे झाले होते पण कृषी विभागाने हा आधारचा पर्याय काढल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button