अहमदनगर

दरोड्याच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीच्या हाती २४ तासात बेड्या

अहमदनगर- संवत्सर (ता . कोपरगाव) येथे सात जणांनी गज, चाकु, लाकडी दांडक्याने मारहाण करुन तिघांना जखमी केले होते. घरातील दोन लाख ८१ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने काढून मोबाईल हिसकावून घेऊन घराचे दरवाजाला बाहेरुन कडी लावून पसार झाले होते.

 

याप्रकरणी कविता अनिल सोनवणे (वय ५० रा. नऊचारी, संवत्सर) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे तपासाबाबत अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

 

नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजव , पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, राहुल सोळुंके, संदीप चव्हाण, दिलीप शिंदे, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रंणजित जाधव, योगेश सातपुते, रविंद्र घुंगासे, विजय धनेधर, मेघराज कोल्हे, चापोहेकॉ संभाजी कोतकर, बबन बेरड, अर्जुन बडे, चापोकों / भरत बुधवंत अशांनी सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी दिलीप विकास भोसले (रा. कारवाडी शिवार, कोकमठाण, ता. कोपरगाव), अनिल अरुण बोबडे (रा. वेस ता. राहाता), राहुल दामू भोसले (रा. जेऊर पाटोदा ता. कोपरगाव) अशांना ताब्यात घेतले.

 

त्यांचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचेइतर साथीदारांसह केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीता कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील कारवाई कोपरगाव शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button