अहमदनगर जिल्ह्यात ‘त्यां’नी चक्क बनावट डिझेल पंपच उभारला
ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर २१ हजार बनावट डिझेल पोलिसांनी जप्त केले डिझेलचा पंप असल्याचे भासवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याची

संगमनेर तालुक्यातील नाशिक- पुणे महामार्गावर चंदनापुरी येथे एका बंद ढाव्याच्या ठिकाणी बनावट डिझेल विकले जात होते.
ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर २१ हजार बनावट डिझेल पोलिसांनी जप्त केले डिझेलचा पंप असल्याचे भासवून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिझेल पंप असल्याचे भासवून वाहनचालकांची फसवणूक सुरू असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी रविवारी (दि.८) कारवाई केली. यात २१ हजार लिटर डिझेलसह प्लास्टिक आणि लोखंडी टाक्या, तसेच डिलिव्हरी पोर्टेबल मशीन पाइप, इलेक्ट्रिक मोटार व इतर साहित्य, असा एकूण १८ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चंदनापुरी येथे एका बंद ढाब्याच्या ठिकाणी हा पंप चालू होता.
सोजिना भाविनकुमार आनंदभाई (वय २९, मूळ रा., आकृती बंगलोज, कॅनॉल रोड, कामरेज, सुरत, गुजरात, सध्या रा. गट क्रमांक २१८, चंदनापुरी, ता. संगमनेर) आणि नितीन सुनील गोसावी (रा. संगमनेर), अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
त्यांच्याविरुद्ध पोलिस नाईक सचिन उगले यांनी फिर्याद दिली आहे. शासनाचा कुठलाही परवाना नसताना डिझेलसदृश ज्वलनशील इंधन बेकायदेशीररीत्या साठवून ठेवले असल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली.
आर्थिक फायद्याकरिता गुन्हा दाखल झालेले दोघे डिझेल पंप असल्याचे भासवून वाहनचालकांची फसवणूक करत होते. पोलिस अधिकारी वाघचौरे यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवीदास डुमणे- पाटील, तसेच पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव हे तेथे पोहोचले.
प्लास्टिक आणि लोखंडी टाक्यांत डिझेलसदृश ज्वलनशील इंधन त्यांना आढळून आले मोजमाप केले असता है इंधन २१ हजार लिटर इतके होते.
कायदेशीर कार्यवाही पूर्ण करत सोमवारी (दि.१०) संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक देवीदास द्रुमणे- पाटील अधिक तपास करीत आहेत.
डिझेलसदृश ज्वलनशील इंधन बेकायदेशीररीत्या साठवून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेचच कारवाईसाठी रवाना झालो. मात्र, तेथे असलेले पळून गेले.
या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले दोघेही फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मुद्देमाल अधिक असल्याने तो जाग्यावरच असून,
तेथे पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हा प्रकार नेमका किती दिवसांपासून सुरू होता? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. -देविदास दुमणे-पाटील, पोलिस निरीक्षक, संगमनेर तालुका