अहमदनगर
अहमदनगरमध्ये जिल्ह्यातील खळबळजनक बातमी तब्बल १ कोटीचा …

कोतवाली गुन्हे शाखेच्या पथकाने आज संध्याकाळी ७ च्या सुमारास लाखोंचा गुटखा जप्त केला आहे.
दरम्यान सध्या पोलिसांची कारवाई सुरू असून हा गुटखा १ कोटीचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोतवाली पोलिसांनीं एका आरोपीला अटक केली होती दरम्यान आरोपीची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर
अहमदनगर शहराच्या MIDC भागात एका गोडाऊनमध्ये आणखीन गुटखा असल्याची कबुली आरोपीने दिली.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने MIDC येथील गोडाऊनवर छापा टाकून लाखोंचा गुटखा जप्त केला आहे.
पोलिसांनी केलेली ही कारवाई सध्या सुरू असून जप्त केलेला गुटखा हा 1 कोटीचा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.