अहमदनगरताज्या बातम्याश्रीगोंदा

अहमदनगर जिल्ह्यातील त्या गोळीबार प्रकरणातील फिर्यादीच निघाला आरोपी

जखमी संतोष उर्फ लाला गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांकडून सुनील राजू गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे जमिनीच्या वादातुन झालेल्या गोळीबार प्रकरणात फिर्यादी सुनील राजू गायकवाड (वय ३०), रा. चिंभळे हाच आरोपी निघाला असून, बेलवंडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जखमी संतोष उर्फ लाला गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांकडून सुनील राजू गायकवाड याला अटक करण्यात आली आहे.

जयदीप सुरमकर याने जमिनीच्या वादातून संतोष उर्फ लाला गायकवाड याच्यावर दि. १० ऑक्टोबर रोजी पिस्टलमधून सहा गोळ्या झाडल्याची घटना घडली.

Advertisement

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या भागवत याला बेलवंडी पोलीसांनी अटक करत तपास सुरू केला. या प्रकरणात फिर्यादी सुनील गायकवाड याचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय होता.

त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता.नुकताच पोलिसांनी जखमी संतोष गायकवाड यांचा जबाब घेतला. फिर्यादी सुनील गायकवाड, हल्लेखोर जयदीप सुरमकर व त्याचा साथीदार सचिन उर्फ चिंग्या सोपान भागवत,

या तिघांनी मिळून गोळीबार घडवून आणल्याचे जखमी गायकवाड यांनी जबाबामध्ये म्हटले आहे. जखमी संतोष गायकवाड यांच्या जबाबावरून बेलवंडी पोलिसांनी फिर्यादी सुनील राजू गायकवाड याला दि. २० संध्याकाळी अटक केली आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button