नगर अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभेत ७ संचालकांचे पद होणार रद्द, या सभासदादाने केला दावा

बहचर्चित नगर अर्बन बँकेची उद्या (दि.१५) सर्वसाधारण सभा होणार असून, या सभेत त्या ७ संचालकांचे पद रद्द होणार असल्याचा ठाम दावा बॅकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केल आहे.
नगरमध्ये १३ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत चोपडा यांनी हा दावा केला. याप्रसंगी सदाशिव देवगावकर, अच्युत पिंगळे, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते. चोपडांसह देवगावकर, पिंगळे, गांधी व ज्ञानेश्वर काळे यांच्या सह्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पत्रकार परिषदेत चोपडा यांनी अर्बन बॅकेच्या कारभारावर चौफेर टिका केली.
ते म्हणाले की, त्या ७ संचालकांना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. बँकेची सर्वसाधारण सभा बोलविण्यात यावी व त्या सभेत २०१४ ते २०१९ या कालावधीत तसेच २०२१ ते २६ या वर्षासाठी ज्यांची निवड झाली आहे, त्यांचे संचालक पद तसेच सभासदत्व रद्द करण्यात यावे. कलम ३०७ प्रमाणे हा आदेश देण्यात आला आहे.
बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ चे कलम ३० व ४७ प्रमाणे कारवाईसाठी ते पात्र राहतील, असेही चोपडा यांनी नमूद केले. दरम्यान, बॅकेच्या उद्या (दि.१५) सर्वसाधारण सभेकडे सवांचे लक्ष लागले आहे.
नगर अर्बन बँकेचा कारभार सातत्याने वादग्रस्त ठरला. अनेक वेळा बँकेच्या कारभाराची चौकशी झाली. बँकेचा कारभार थेट पोलिस ठाणे ते कोर्टापर्यंत गेले असल्याने उद्या नेमके काय होणार? याची उत्सुकता सभासदांमध्ये शिगेला पोहोचली आहे.