मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नगरमध्ये रंगणार राज्यस्तरीय कुस्तीचा थरार

शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे २० ते २३ एप्रिल दरम्यान होणाऱ्या छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. ११ एप्रिल) मैदानाचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने ही तीन दिवसीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे.
मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ एस.एस. दीपक, भाजप शहराध्यक्ष महेंद्र गंधे, युवा नेते सुवेंद्र गांधी, अभय आगरकर, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, गोरख खंडागळे, श्याम लोंढे, वसंत लोंढे, सचिन पारखे, मोहन हिरणवाळे, मनिष साठे, बाळासाहेब भुजबळ, दत्ता गाडळकर, विशाल गर्जे, संतोष गांधी, नितीन शेलार, सुहास पाथरकर,
सागर शिंदे, बाळासाहेब गदादे, प्रताप चिंधे, सुचित खरमाळे, केलास गर्जे, नामदेब लंगोटे, मिलिंद भालसिंग, कुंडलिक गदादे, बाळासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते. छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा वाडियापार्क क्रीडा संकुल येथे माती व गादी विभागात रंगणार आहे.
माजी पालकमंत्री आ.राम शिंदे या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेचे विशेष आकषण म्हणजे विजेत्या खेळाडूस अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय विजेत्या मल्लास दोन लाख, तर तृतीय स्पर्धकास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
तसेच विविध वजन गटात लाखो रुपयांचे बक्षीसं ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी दिली. या स्पर्धेसाठी शिवसेना, भाजप व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.