अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बाजारसमितीत गहू 2241 तर सोयाबीन 6425 रुपये क्विंटल !

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल शनिवार दि. 28 मे 2022 रोजी गव्हाची 8 क्विंटल आवक झाली.

गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2150 रुपये तर जास्तीत जास्त 2241 रुपये इतका भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2200 रुपये क्विंटल भाव मिळाला.

तसेच कोल्हार उपबजारात सोयाबीनची 5 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल कमीत कमी 5901 रुपये तर जास्तीत जास्त 6425 रुपये भाव मिळाला. सोयाबीनला सरासरी 6175 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

तसेच मक्याची 3 क्विंटल आवक झाली. मक्याला सरासरी प्रति क्विंटल 1900 रुपये भाव मिळाला. हरभर्‍याची 6 क्विंटल आवक झाली. हरभर्‍याला सरासरी प्रति क्विंटल 4000 रुपये भाव मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button