अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! राक्षस आजोबाने केला नातवाचा खून..

अहमदनगर जिल्ह्यात एका घटनेने आजोबांच्या नावाला काळीमा पुसला गेला आहे.एका निर्दयी आजोबाने आपल्या पाच वर्षाच्या नातवाचा जीव घेतल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील तीन चारी वस्ती येथे हा धक्कादायक प्रकार घडला. आई-वडील संभाळत नाही म्हणून आजोबाकडे असलेल्या नातवाचा ६० वर्षीय आजोबाने गुरुवारी रात्री निर्घुण खून केला.

गावातील अज्ञात व्यक्तीने पोलीस स्टेशनला करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानुसार गोदावरी नदी काठी पुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून सदर आरोपीने गुन्हा कबूल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button