अहमदनगरलेटेस्ट

शिर्डी देवस्थानाच्या या विश्वस्तांच्या घरी आयकरची छापेमारी !

जाणून घ्या काय आहे त्यांचे ठाकरे कनेक्शन

शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकरची छापेमारी करण्यात आली आहे.राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. (Rahul Kanal IT Raid)

यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यशवंत जाधव यांच्यापाठोपाठ शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याच्या घरी आयकर विभागानं धाडी टाकल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय तसेच शिर्डी संस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल हे सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहे. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी सुरु आहे.

आज आयकर विभागानं मुंबईत आणि पुण्यात छापेमारी सुरु केली आहे. आयकर विभागाचं एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आलं आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली.

यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की, नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही.

तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, ही छापेमारी कोणत्या प्रकरणाशी निगडीत आहे, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

कोण आहेत राहुल कनाल?

राहुल कनाल शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदी आहेत
मातोश्रीच्या जवळचे म्हणून राहुल कनाल यांची ओळख
युवा सेना कोअर कमिटीत राहुल कनाल आहेत
टीम आदित्यचा एक चेहरा राहुल कनाल आहे
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत राहुल कनाल यांच्या नावाची होती चर्चा
महापालिकेत शिक्षण समिती सदस्य देखील राहिले आहेत

Related Articles

Leave a Reply

Back to top button