अहमदनगर

बाजारात लाल कांद्याच्या आवकेत वाढ; मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये उन्हाळ गावरान कांद्याच्या दरात मोठी घट झाली आहे. तर लाल कांद्याचे दर स्थिर आहेत. लाल कांद्याला 2100 रुपयांपर्यंत तर गावरान कांद्याला जास्तीत जास्त 1350 रुपयांपर्यंत भाव मिळाला. काल कांद्याची एकूण 62 हजार 573 गोण्या आवक झाली.

 

लाल कांद्याच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. लाल कांद्याची 58 हजार 177 गोण्या आवक झाली. एक-दोन लॉटला 1900 ते 2100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोठा कलरपत्तीवाल्या कांद्याला 1700 ते 1800 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1500 ते 1600 रुपये, गोल्टा कांद्याला 1200 ते 1400 रुपये तर गोल्टी कांद्याला 800 ते 850 रुपये भाव मिळाला.

 

उन्हाळ गावरान कांद्याच्या एक-दोन लॉटला 1300 ते 1350 रुपये, मोठा कलर पत्तीवाल्या कांद्याला 1200 ते 1300 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1100 रुपये, गोल्टा कांद्याला 500 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 500 रुपये, जोड कांद्याला 200 ते 300 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button