Indian Railway : ट्रेनला उशीर झाल्यास चिंता करू नका ! फक्त 30 ते 40 रुपयांत बुक करा आलिशान एसी रुम ; कसे ते जाणून घ्या
इंडियन रेल्वे रिटायरिंग रूम जर तुमची ट्रेन उशीर झाली असेल किंवा तुमची ट्रेन वेळेआधी पोहोचली असेल, तर तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊन तुमची रूम बुक करू शकता.

Indian Railway : रेल्वे ही भारतीय लोकांची जीवनदायी मानली जाते. दररोज देशात लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. अशा वेळी जर तुम्हालाही रेल्वेने आरामदायी प्रवास करायचा असेल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचा.
अनेकवेळा लोक कामाच्या व्यापामुळे रेल्वेमध्ये जाण्यासाठी उशीर होतो. अशा वेळी रेल्वे गेल्याने तुम्हाला तितेच अडकून राहावे लागते. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
कारण जर तुमची ट्रेन उशीर झाली असेल किंवा तुमची ट्रेन वेळेआधी पोहोचली असेल, तर तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊन तुमची रूम बुक करू शकता. यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल.
पण तुम्हाला माहिती आहे का की भारतीय रेल्वे आपल्या काही स्थानकांवर रिटायरिंग रूमची सुविधाही उपलब्ध करून देते. तुम्ही स्टेशनवर आराम करण्यासाठी फक्त 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत रूम बुक करू शकता. तुम्ही रिटायरिंग रूमबद्दल सविस्तर जाणून घ्या.
ट्रेन लेट झाली की सुविधा उपलब्ध आहे
रेल्वेची ही खास सुविधा तुम्हाला स्टेशनवर पाहायला मिळेल. जर तुमची ट्रेन उशिरा आली असेल किंवा तुमची ट्रेन वेळेपूर्वी पोहोचली असेल, तर तुम्ही IRCTC वेबसाइटला भेट देऊन तुमची रूम बुक करू शकता.
बुकिंगसाठी तुम्हाला पीएनआर नंबर वापरावा लागेल. यानंतर, तुम्ही स्टेशनच्या खोल्यांमध्ये आरामात राहू शकता. समजा तुमची ट्रेन दोन, चार किंवा सात तास उशिराने येणार असेल तर ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन रिटायरिंग रूमची सुविधा देते.
रेल्वे रिटायरिंग रूमची सुविधा काय आहे?
आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा तुमची ट्रेन लेट होते तेव्हा तुम्हाला IRCTC रिटायरिंग रूमची सुविधा मिळते. यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल. हे ट्रेनच्या वेळेच्या आधी किंवा नंतर 12 ते 24 तासांसाठी बुक केले जाऊ शकतात.
म्हणजेच, जर तुम्हाला खोलीची आवश्यकता असेल तर तुम्ही ती 12 तासांसाठी किंवा संपूर्ण दिवसासाठी भाड्याने घेऊ शकता. तिकीटाच्या पीएनआर क्रमांकासह साइटला भेट देऊन त्याचे बुकिंग तुम्ही करू शकता.
एसी आणि नॉन एसी रूम भाड्याने मिळू शकतात
प्रमुख स्थानकांवर तुम्हाला दोन प्रकारच्या रेल्वे रिटायरिंग रूम्स पाहायला मिळतात. यामध्ये एसी आणि नॉन एसी दोन्ही खोल्यांचा समावेश आहे. तुम्ही इंटरनेटच्या मदतीने रिटायरिंग रूमची आगाऊ बुकिंग देखील करू शकता.
रिटायरिंग रूमची सुविधा फक्त त्या प्रवाशांसाठी उपलब्ध असेल ज्यांच्याकडे तिकीट कन्फर्म आहे किंवा ज्यांच्याकडे आरएसी तिकीट आहे. वेटिंग तिकीट, कार्ड तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट असलेल्यांना रिटायरिंग रूमची सुविधा मिळत नाही. जर तुमच्याकडे 500 किमी अंतराचे जनरल तिकीट असेल तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.