अहमदनगर
विकत होता देशी दारू; पोलिसांनी मारला छापा

केडगाव उपनगरातील बालाजी हॉटेलच्या पाठीमागे विक्री होत असलेल्या देशी दारूवर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला.
या प्रकरणी रमेश दामोधर कोतकर (वय 45 रा. कोतकर मळा, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलिसांत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार सोमनाथ राऊत यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, अमोल गाडे, दीपक रोहकले, सोमनाथ राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
Advertisement