अहमदनगर

इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाच्या व्हिडीओ बाबत एसपींकडे केली तक्रार

समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत येत असतात. यापूर्वी त्यांचा करोना संबंधी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.

त्यांच्या अशाच काही वादग्रस्त विधानाच्या क्लिप सोशलवर मीडियावर चांगल्याच व्हायरल झाला होत्या. माझ्या कीर्तनाच्या बनावट सीडी प्रसारित करण्याचा प्रकार सध्या घडत असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी,

अशी मागणी प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली होती. या संदर्भामध्ये पुणे जिल्ह्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

काहींनी माझ्या कीर्तनाच्या सीडी बनावट तयार करुन त्या शेमारू म्हणजेच मराठी बाणा या वाहिनीवरून प्रसिद्ध करत असल्याचे मला समजले आहे. कीर्तनामध्ये काही छेडछाड करून चुकीचं प्रसिद्ध होण्याची शक्यता असून या माध्यमातून माझी बदनामी होण्याचा संभव आहे.

मराठी बाणा या वाहिनी बरोबर कोणताही करार केलेला नसताना ते अनधिकृतपणे सीडी प्रसारित करत आहे, सदर या वाहिनीवर माझी कीर्तने प्रसिद्ध करू नये म्हणून त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदोरीकर यांनी केली होती.

याबाबत एसपी पाटील म्हणाले, इंदोरीकर महाराज यांनी दिलेल्या अर्जाबाबत माहिती घेऊन संबंधित कंपनीकडे तपासणी केली. संबंधित कंपनीने त्यांच्याकडील कागदपत्रांनुसार रीतसर परवानगी घेतलेली असल्याने कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button