के.के.रेंज हद्दीत घुसखोरी; तिघांवर गुन्हा

अहमदनगर – के.के.रेंज हद्दीमध्ये खासगी वाहन व व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असतानाही तिघांनी तेथून मातीची वाहतूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के.के.रेंजच्या ए.एन.डी. विभागाचे नायब सुभेदार मुकेश विशंभर सिंग कुमार (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे. दोन डंपर व माती असा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही डंपरचा मालक राम निमसे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. खारेकर्जुने ता. नगर) व दोन्ही डंपरचे चालक (नावे माहिती नाही) यांच्या विरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 मे, 2022 रोजी ही घटना घडली असून 6 जुलै, 2022 रोजी फिर्याद दाखल झाली आहे.
के.के.रेंज हद्दीमध्ये खासगी वाहन व व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई आहे. असे असतानाही डंपर चालक व मालक यांनी 14 मे, 2022 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास के.के.रेंज हद्दीतून दोन डंपरच्या सहाय्याने मातीची वाहतूक करताना मिळून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.