बाजारभाव

मार्केटला कांद्याची आवक वाढली; गावरान आणि लाल कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी गावरान कांद्याला जास्तीत जास्त 1700 तर लाल कांद्याला 2200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 62 हजार 506 गोण्या आवक झाली.

 

उन्हाळ गावरान कांद्याच्या एक-दोन लॉटला 1500 ते 1700 रुपये, मोठा कलरपत्ती कांद्याला 1300 ते 1500 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1200 रुपये, गोल्टा कांद्याला 500 ते 700 रुपये, गोल्टी 300 ते 500 रुपये, जोड कांद्याला 200 ते 300 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. नवीन लाल कांद्याची 53 हजार 212 गोण्या आवक झाली.

 

एक-दोन लॉटला 2100 ते 2200 रुपयांचा भाव मिळाला. मोठ्या कलरपत्तीवाल्या कांद्याला 1800 ते 1900 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1600 ते 1750 रुपये, गोल्टा 1200 ते 1500 रुपये, गोल्टी कांद्याला 800 ते 1000 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button