अहमदनगर

वारसाहक्कात संपत्तीसोबतच कर्जही मिळते; जाणून घ्या कोणकोणत्या कर्जाची परतफेड करावी लागू शकते

वारसाहक्कात संपत्तीसोबतच (wealth) कर्जही मिळतं. मात्र, आपण कर्जाकडे (debt) लक्ष देत नाही. जेंव्हा माहिती मिळते तोपर्यंत कर्जाची रक्कम वाढलेली असते.

अशा परिस्थितीमध्ये काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच जर तुम्ही बँकेचे (bank) वारसहक्काने आलेले कर्ज फेडू शकला नाहीत तर बँकेला कोणते अधिकार असतात हे देखील आपल्याला माहित नसते.

आज आपण या सर्व गोष्टी जाणून घेणारच आहोत. पण त्यापूर्वी वारसाहक्क कर्ज म्हणजे काय ते जाणून घेऊयात. वारसाहक्क कर्ज म्हणजे तुमच्या आजोबा किंवा वडिलांनी एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते कर्ज न फेडताच त्यांचा मध्येच मृत्यू झाला,

तर ते कर्ज बँक त्यांच्या मुलाकडून म्हणजेच तुमच्याकडून वसूल करते. अशा कर्जाला वारसाहक्क कर्ज असे म्हणतात. वारसाहक्कात केवळ संपत्तीच नाही मिळत तर संबंधित व्यक्तीचे कर्ज देखील मिळते.

असे कर्ज जर आपल्या वाट्याला आले तर काय करावे. अशा प्रकरणात बँकेला कोणकोणते अधिकार असतात ते आज आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

वारसहक्काने कर्ज मिळाल्यास काय करावे? :- संजीव नेहमी आनंदी राहत होता. राहायलाही पाहिजे, मात्र, वेळेपुढे सर्वच हतबल होतात. कोरोनाकाळात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि अडचणींचा डोंगर उभा राहिला.

संजीवला त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीसह कर्जाचं देणं वारसदार म्हणून मिळालं. संजीवसाठी या सर्व गोष्टी नव्या आणि त्रासदायक असल्यानं तो वैतागला होता. कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीसोबतच कर्जाची परतफेडही करावी लागते

असं कर सल्लागार बळवंत जैन सांगतात. मात्र अनेकांना वारसाहक्कानं संपत्ती मिळते एवढंच माहिती असते. कर्जाबाबत त्यांना माहिती नसते.

वारस हक्काने बँकेने कर्ज हस्तातंरित केल्यास काय करावे हे माहित नसल्याने अनेक जण अडचणीत सापडतात. त्यांची स्थिती संजीव सारखीच होते.

संजीवच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गृहकर्जाचा हप्ता थकला. बँकेनं संजीवसोबत संपर्क केला आणि उर्वरित कर्ज संजीवच्या नावानं हस्तातंरित केलं.

मग आता संजीवनं काय करायला हवं ? :– कर्ज हस्तातंरित झाल्यास ते जर परत फेड करण्याची ताकद नसेल तर संजीवने काय करावे? संजीवनं बँकेशी संपर्क साधावा. जर त्याची आर्थिक परिस्थिती हप्ते भरण्यासारखी नसेल तर काही काळ मुदत मागावी.

बँक संजीवला कर्जाची परतफेड करण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. मात्र, कर्जदाराची संपत्ती विकण्याचा अधिकार बँकेला आहे.

अशाप्रकरणात बँक या अधिकाराचा वापर करू शकते. अशा परिस्थितीमध्ये संजीवकडे एकच पर्याय शिल्लक राहातो, तो म्हणजे कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी बँकेकडून वेळ मागून घेणे. थकीत कर्ज प्रकरणात संबंधित संपत्तीचा लिलाव करण्याचा अधिकार देखील बँकेला आहे.

असुरक्षीत कर्ज देखील होते हस्तातंरित :- कोणत्तीही संपत्ती गहाण न ठेवता घेतलेले कर्ज म्हणजेच पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड हे असुरक्षित कर्ज आहेत. कर्जदाराच्या मृत्यूनंतर असुरक्षित कर्जाची वसुली बँका वारसदारांकडून करतात.

एकापेक्षा जास्त उत्तराधिकारी असल्यास थकबाकीदारांमध्ये सर्वच उत्तराधिकाऱ्याचं नाव येतं. तसेच कर्जाच्या वसुलीसाठी बँका न्यायालयातही जातात. बँकेशी संपर्क साधल्यास कर्जाची परफेड करण्यासाठी व्याजमाफीसह इतर सुविधाही बँक देऊ शकते.

आयकर नियम 159 नुसार वारसदारांना थकित आयकरही भरावा लागतो. उत्तराधिकाऱ्याला त्याच्या खिशातून हा आयकर भरावा लागत नाही. संपत्तीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागत असल्यास तेवढा कर मात्र भरावा लागतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button