अहमदनगर
दारूच्या नशेत मित्रानेच केला घात; जीवे मारले

संगमनेर तालुक्यातील खांडगाव रोडवर सुपेकर वस्तीजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. दारुच्या नशेत येवून भांडण करुन एकाने आपल्याच मित्राचा मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकाजणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश ऊर्फ पप्पू दुर्यधन गोफणे (वय 32, रा. संगमनेर खुर्द, शितळामाता मंदिराजवळ, संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुरज सोमनाथ जेडगुळे (रा. संगमनेर खुर्द) हा दारु पिवून आला होता. त्याचे व प्रकाश गोफणे याचे आपसात भांडणे झाली.
प्रकाश गोफणे याने सुरज जेडगुळे याच्या तोंडावर लाकडी दांडा मारला. यामुळे चिडून जाऊन सुरज जेडगुळे याने कशानेतरी मारुन प्रकाश गोफणे याला जिवे ठार मारले.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात शंकर दुर्योधन गोफणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी सुरज सोमनाथ जेडगुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख करत आहे.