Investment Tips : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ क्वालिटी शेअर्स, पुढच्या दिवाळी पर्यंत व्हाल कोट्याधीश…

दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दिवाळीपासून आतापर्यंत शेअर बाजारातून चांगले रिटर्न मिळाले आहेत.
क्वालिटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार तर मालामाल झाले आहेत. या दिवाळीत तुम्हीही गुंतवणूक करण्यापूर्वी शेअर बाजार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कशी करावी, हे जाणून घ्या. जेणेकरून शेअर बाजारातून तुम्हाला पुढील दिवाळीपर्यंत चांगले आणि सुरक्षित रिटर्न मिळू शकतात.
आयसीआयसीआय बँक
पुढील दिवाळीपर्यंत आयसीआयसीआय बँक या बँकिंग स्टॉकमध्ये चांगली वाढ दिसून येईल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये या शेअर्सची खरेदी करण्याची संधी गमावू नये. 699 च्या स्टॉपलॉससह खरेदी करा, दिवाळीपर्यंत यामध्ये 1050 रुपयांचे उद्दिष्ट दिसू शकते.
एसबीआय
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये पुढील दिवाळीपर्यंत 575 ते 600 रुपयांचे उद्दिष्ट दिसून येईल, असे ते म्हणाले. तसेच 444 वर स्टॉपलॉस ठेवा. यामध्ये तुम्ही दर महिन्याला एसआयपी करत राहा
एचडीएफसी बँक
एफ अँड ओ ट्रेडचे असित बरनपाती यांनी एचडीएफसी बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, ‘हे 1400 रुपयांच्या स्टॉपलॉसने खरेदी करा. यामध्ये दिवाळीपर्यंत 2200 ते 2300 रुपयांचे उद्दिष्ट दिसू शकते. दर चार महिन्यांनी हे शेअर उच्चांक गाठत आहे.
एल अँड टी
एमओएफएसएल चे चंदन तापडिया यांनी एल अँड टीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, यामध्ये दिवाळीपर्यंत 2200 रुपयांचं उद्दिष्ट दिसू शकतं. त्यात 1600 चा स्टॉप लॉस ठेवा. साप्ताहिक आणि डेली चार्टमध्ये तेजीचा पॅटर्न तयार होत आहे. हे वेट काउंटर आहेत जे चढउतारांमध्ये त्यांची पातळी राखू शकतात.
एचडीएफसी
एफ अँड ओ ट्रेडचे असित बरनपाती यांनी एचडीएफसीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, 2300 रुपयांच्या स्टॉपलॉसने हे खरेदी करा. यामध्ये दिवाळीपर्यंत 3600 रुपयांचे उद्दिष्ट दिसू शकतं. घरांची मागणी वाढत असून रिअल इस्टेट क्षेत्राला गती मिळत असल्याने या स्टॉकमध्ये तेजी येऊ शकते.
टाटा मोटर्स
असित यांनी टाटा मोटर्स शेअर्स खरेदीवरही आपलं मत दिलं आहे. ते म्हणाले की, टाटा मोटार्स मूल्यांकनाच्या बाबतीत अजूनही स्वस्त आहे. तसेच, कंपनी ईव्ही स्पेसमध्ये खूप वेगाने काम करत आहे. त्यामुळे त्यांची कामगिरी अधिक चांगली होण्याची अपेक्षा आहे. पुढील दिवाळीपर्यंत तुम्ही टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करू शकता.