अवैध दारू विक्री बघण्यासाठी पोलीस अधिक्षकांना राजूरला येण्याचे निमंत्रण

Ahmednagar News: मागील काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील अवैध दारूविक्री वाढली आहे. सध्या शाहूनगरला व राजूरला खुलेआम दारू विक्री सुरू आहे.
त्यामुळे आता पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी अकोल्यात व राजूरला भेट द्यावी व अवैध दारूची वस्तुस्थिती बघावी, असे निमंत्रण दारूबंदी आंदोलनाने नुकतेच अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन दिले आहे.
जर अवैध दारू बंद झाली नाही तर लवकरच शाहूनगर मध्ये पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला १५ ऑगस्टच्या आंदोलनानंतर बंद झालेली अवैध दारू पुन्हा शाहूनगर, कोतुळ, राजूर, देवठाण, लिंगदेव, इंदोरी फाटा, वीरगाव फाटा येथे अवैध दारू विक्री वाढली आहे.
राजूर हे दारूबंदीचे गाव असूनही खुलेआम रस्त्यावर विक्री होत आहे. इंदोरी फाटा येथील हॉटेलातून तालुक्यात दारू विक्री होत असल्याने ते हॉटेल व बोरगाव फाटा येथील हॉटेल प्रशासनाने सोल करावे व इंदोरी फाटा येथील गुन्हेगार तालुक्यातील तडीपार करावा, अशी मागणी केली आहे.
संगमनेर, ठानगाव, आळेफाटा येथून दारूच्या गाड्या येतात. मात्र पोलीस व उत्पादन शुल्क ते थांबवत नाही. त्यामुळे दारूविक्रोत सामील असलेले पोलीस कर्मचारी निलंबित करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निम्रळ, निळवंडे, इंदोरी गाव येथे अवैध दारू विक्री सुरू असून राजूरमध्ये देखील खुले आम दारू विकली जात आहे.
त्याचप्रमाणे राजूर परिसरात खडको, पाडाळणे, दारूबंदी आंदोलनाचे निवेदन शिसवद, रंधा, आंबित, वाकी बंगला या गावात दारू विक्री सुरू असून तेथील विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेंडी भांडरदरा येथील दुकानातून राजूरमध्ये दारू येत असल्याने या दुकानांचे परवाने निलंबित करण्याची व राजूरमधील विक्रते तडीपार करण्याची मागणी करण्यात आली आहे. अवैध दारू न थांबल्यास लवकरच वरील सर्व गावातील गावकरी घेवून आंदोलन केले जाईल, असे दारूबंदी आंदोलनाने जाहीर केले आहे.