iPhone 15 Updates : ऍपलने आयफोन 15 च्या किंमती केल्या जाहीर, खालील यादीत सर्व मॉडेल्सच्या किंमती सविस्तर जाणून घ्या
ऍपलने आयफोन 15 सीरिज लॉन्च केली आहे. आता कंपनीने या सर्व मॉडेल्सच्या किमती जाहीर केल्या आहेत. तुम्ही त्या पाहू शकता.

iPhone 15 Updates: भारतीय बाजारात गेले अनेक दिवसांपासून लोक आयफोन 15 ची वाट पाहत होते. आता ऍपलने त्यांचा नवीन फोन बाजारात लॉन्च केला आहे, ज्याची किंमत पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
दरम्यान, आयफोन 15 सीरिजमधील – आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स लॉन्च करण्यात आले आहेत आणि त्यांच्या किंमती देखील भारतीय बाजारपेठेत उघड करण्यात आल्या आहेत.
सर्व नवीन iPhone 15 मॉडेल्समध्ये कॅमेरा आणि परफॉर्मन्स संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त, डायनॅमिक आयलंड वैशिष्ट्य, जे आधी फक्त प्रो मॉडेल्समध्ये उपलब्ध होते, आता ते नॉन-प्रो मॉडेल्सचा भाग बनले आहे.
कॅमेरा अपग्रेड व्यतिरिक्त, कंपनीने डिझाइनमध्ये काही बदल केले आहेत आणि चांगल्या कामगिरीसाठी, नवीन A17 Pro चिपसेट iPhone 15 Pro आणि 15 Pro Max मध्ये देण्यात आला आहे. या बदलांसह नवीन मॉडेल्स प्रीमियम किमतीत लाँच करण्यात आले आहेत.
भारतात iPhone 15 ची किंमत
नवीन iPhone 15 चे 128GB स्टोरेज असलेले बेस मॉडेल 79,900 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, 256GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आणि हाय-एंड 512GB व्हेरिएंटची किंमत 109,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हे मॉडेल ब्लू, पिंक, यलो, ग्रीन आणि ब्लॅक या पाच रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
iPhone 15 Plus ची भारतात किंमत
मोठ्या स्क्रीन आकारासह iPhone 15 Plus निळ्या, गुलाबी, पिवळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये देखील खरेदी केले जाऊ शकतात. 128GB स्टोरेजसह त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. या मॉडेलचा 256GB व्हेरिएंट 99,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे Apple ने 512GB व्हेरिएंटची किंमत 119,900 रुपये ठेवली आहे.
भारतात iPhone 15 Pro ची किंमत
नॅचरल टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम आणि ब्लॅक टायटॅनियम या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध, iPhone 15 Pro ची सुरुवातीची किंमत 128GB बेस मॉडेलसाठी 134,900 रुपये ठेवण्यात आली आहे.
त्याचा 256GB व्हेरिएंट 144,900 रुपयांना आणि 512GB व्हेरिएंट 164,900 रुपयांना खरेदी करता येईल. सर्वात महाग 1TB स्टोरेज व्हेरिएंटची भारतात किंमत 184,900 रुपये आहे.
iPhone 15 Pro Max ची भारतात किंमत
iPhone 15 Pro Max ची किंमत 159,900 रुपये आहे. फोनचा 512GB स्टोरेज व्हेरिएंट 179,900 रुपये आणि हाय-एंड 1TB व्हेरिएंट 199,900 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हे नॅचरल टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम आणि ब्लॅक टायटॅनियम कलर पर्यायांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.
सर्व नवीन iPhone 15 मॉडेल्ससाठी प्री-ऑर्डर शुक्रवार, 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता सुरू होतील. नवीन Apple डिव्हाइस पुढील आठवड्यात शुक्रवार, 22 सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी उपलब्ध होतील.
खरेदी कसा करायचा ?
अॅपल स्टोअर्स, ऍपल ऑनलाइन स्टोअर, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि निवडक रिटेल स्टोअर्समधून ही उपकरणे ग्राहक खरेदी करू शकतात.