ताज्या बातम्या

iPhone 16 Details : आयफोन 15 लाँच होण्यापूर्वी iPhone 16 चे स्पेसिफिकेशन झाले लीक, जाणून घ्या लागेल वेड…

नवीनतम लीकनुसार, आयफोन 16 सीरीजला कॅमेरासह एक मोठा अपडेट मिळाले आहे. मात्र अजून आयफोन 15 देखील लॉन्च झाला नाही.

iPhone 16 Details : देशात मोठ्या प्रमाणात लोक आयफोनचे चाहते आहेत. अनेकजण हे ब्रँडेड फोन खरेदीची स्वप्ने पाहत असतात. अशा वेळी तुम्ही देखील आयफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गोड बातमी आलेली आहे.

कारण दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील कंपनीचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यावर्षी iPhone 15 सीरीज सप्टेंबरमध्ये लॉन्च होईल. iPhone 15 लाँच होण्याआधीच त्याची अनेक माहिती लीक झाली आहे. तर, आयफोन 16 सीरिजच्या लीकविषयी माहिती समोर येत आहे.

होय, iPhone 15 अजून लॉन्च झालेला नाही की त्याच्या पुढच्या मॉडेलची माहिती लीक होऊ लागली आहे. आयफोन 16 चे स्पेसिफिकेशन ऑनलाइन लीकमधून समोर येत आहेत. ताज्या लीकनुसार, iPhone 16 सीरीजला कॅमेऱ्यासह मोठे अपडेट मिळाले आहे.

iPhone 16 सीरीजचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत

ऑनलाइन लीक्सनुसार, आयफोन 16 प्रो मॅक्स मॉडेलला कॅमेरासह एक प्रमुख अपडेट मिळेल. यात एक सुपर टेलिफोटो पेरिस्कोपिक झूम कॅमेरा मिळू शकतो. असा दावा केला जात आहे की iPhone 15 आणि iPhone 15 Pro मॉडेल्समध्ये पेरिस्कोपिक कॅमेरा असू शकतो. तर, iPhone 15 चे नॉन-प्रो मॉडेल 48-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासह असू शकते.

iPhone 16 Pro Max ला मोठा कॅमेरा अपडेट मिळेल

iPhone 16 Pro Max चे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. यानुसार, iPhone 16 सिरीजमध्ये टेलिफोटो पेरिस्कोपिक झूम कॅमेरासह येईल, ज्यामध्ये सुपर झूम लेन्सची फोकस लांबी 300mm असू शकते.

तर, सध्याच्या iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मधील फोकस लांबी सुमारे 77mm आहे. दुसरीकडे, जर आयफोन 16 सीरीजमध्ये 300mm फोकल लांबीची झूम लेन्स असेल, तर तो एक मोठा बदल असणार आहे.

याशिवाय iPhone 14 Pro सीरीजच्या तुलनेत iPhone 16 Pro Max मध्ये अधिक इंच कॅमेरा देखील मिळू शकतो. असे सांगितले जात आहे की iPhone 16 Pro Max मध्ये 1/1.14-इंचाचा कॅमेरा सेंसर असेल. तर, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मध्ये 1/1.28-इंचाचा कॅमेरा सेन्सर आहे. iPhone 15 Pro मध्ये 5-6x ऑप्टिकल झूमिंगसह पेरिस्कोपिक कॅमेरा दिला जाऊ शकतो.

A17 Bionic चिपसेट iPhone 16 Pro Max मध्ये उपलब्ध असेल

लीकवरून असे समोर आले आहे की आयफोन 16 सीरीजमध्ये समाविष्ट केलेल्या प्रो मॉडेलमध्ये A17 बायोनिक चिपसेट असेल. तसेच याचे नॉन प्रो मॉडेल 48 मेगापिक्सेल वाइड कॅमेरासह असेल. तर, A16 बायोनिक चिपसेट आगामी iPhone 15 सीरिजच्यात समाविष्ट असलेल्या iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये आढळू शकतो.

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button