टेक्नॉलॉजी

iQOO Smartphone : 10 मिनिटात 100% चार्ज होणारा iQOO चा तगडा फोन येतोय, 31 ऑगस्टला होणार लाँच; जाणून घ्या किंमत

iQOO Z7 Pro स्मार्टफोन 31 ऑगस्टला भारतात दाखल होणार आहे. हा फोन 10 मिनिटात 100% चार्ज होणारा आहे.

Advertisement

iQOO Smartphone : भारतीय बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होतात. हे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करत असतात. सध्या सोशल मीडियाच्या युगात सर्वाना स्मार्टफोनची गरज आहे.

जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण आता बाजारात iQOO Z7 Pro स्मार्टफोन 31 ऑगस्टला लाँच होणार आहे. पण हा फोन अधिकृत लॉन्च होण्याआधी, भारतातील iQOO Z7 Pro ची किंमत Amazon वर लीक झाली आहे.

Amazon वरील मायक्रोसाइटने iQOO Z7 Pro चा प्रोसेसर MediaTek Dimensity 7200 SoC असल्याचे सांगत आहेत. तसेच हे देखील उघड केले आहे की फोनचा AnTuTu स्कोअर या सेगमेंट सर्वात जास्त आहे.

Advertisement

भारतातील iQOO Z7 Pro किंमत (अपेक्षित)

कमीत कमी एक iQOO Z7 Pro मॉडेलची किंमत भारतात 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. त्याच वेळी, 12 GB पेक्षा जास्त रॅम वेरिएंटमध्ये येण्याच्या अफवा देखील आहेत, ज्याची किंमत सुमारे 30,000 रुपये असू शकते.

iQOO Z7 Pro स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

Advertisement

प्रोसेसर: iQOO Z7 Pro 5G च्या आत TSMC द्वारे निर्मित MediaTek Dimensity 7200 4nm चिप आहे. ही एक ऑक्टा-कोर चिप आहे ज्याचा टॉप क्लॉक स्पीड 2.8GHz पर्यंत आहे.

मेमरी: iQOO या फोनला 12GB पर्यंत RAM ने विस्तारण्यायोग्य RAM वैशिष्ट्यासह सुसज्ज करू शकते. तसेच या स्मार्टफोनला किमान 256GB ऑनबोर्ड स्टोरेज असणार आहे.

कॅमेरा: OIS सपोर्ट आणि रिंग-LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Advertisement

डिस्प्ले: iQOO Z7 Pro मध्ये मध्यभागी होल-पंच कटआउटसह AMOLED स्क्रीन असू शकते.

बॅटरी: 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,600mAh सेल असू शकतो जो एका तासापेक्षा कमी वेळेत फोन 0-100 चार्ज करण्यास सक्षम आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button