अहमदनगर

लिंबाच्या झाडाला गळफास घेत इसमाची आत्महत्या; या ठिकाणची घटना

संगमनेर तालुक्यातील साकूरनजीक असलेल्या चितळकर वस्ती येथील एकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवार (ता.29) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

दरम्यान कारभारी उर्फ दादू आंबू चितळकर (वय 47) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, चितळकर वस्ती येथील कारभारी उर्फ दादू चितळकर यांनी हिवरगाव पठार गावच्या शिवारातील वन विभागाच्या हद्दीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.

याप्रकरणी बाळू चितळकर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान कारभारी उर्फ दादू चितळकर यांनी आत्माहत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button