ISRO Missions : चांद्रयान -3 च्या यशानंतर आता इस्रोचे सूर्य आणि शुक्रावर लक्ष, काय असेल पुढील नियोजन? जाणून घ्या
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं लँडर उतरवून नवा इतिहास नोंदवला आहे. हे यश अर्थातच भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोचं आहे.

ISRO Missions : चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. चांद्रयानाच्या माध्यमातून चंद्राच्या लपलेल्या भागाचा अभ्यास इस्रो करणार आहे. तर, सूर्याचा आणि शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी देखील इस्रो उपग्रह पाठवणार आहे.
आता सूर्यावर झेप
दरम्यान, इस्रोने आपल्या ‘आदित्य एल-1’ या मोहिमेची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. या माध्यमातून इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी आदित्य नावाचा हा उपग्रह पृथ्वीबाहेरील एल-1 या पॉइंटवर ठेवण्यात येईल. विशेष म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच याचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.
गगनयान मोहीम
आतापर्यंत भारताने एकही अंतराळवीर अवकाशात पाठवलेला नाही. यासाठीच, इस्रो गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास स्वतः अवकाशात मानव पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. ही मोहीम 2024 साली पार पाडण्याचं इस्रोचं लक्ष्य आहे.
मंगळयान अन् शुक्रयान
पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारं इस्रो आणखी एका मंगळ मोहिमेची तयारी करत आहे. सोबतच, शुक्र ग्रहासाठी देखील एक मोहीम राबवण्यात येणार आहे. अर्थात, या दोन्ही मोहिमांबद्दल सध्या अधिक माहिती उपलब्ध नाही.
विक्रम लँडरचे चार payloads जाणून घ्या
– पहिली रंभा (RAMBHA) ते चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि भिन्नता तपासेल.
– सेकंड चास्ट (ChaSTE) ते चंद्राच्या पृष्ठभागाच्या उष्णतेची चाचणी करेल.
– तिसरा आहे Ilsa (ILSA). हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपाच्या क्रियाकलापांची तपासणी करेल.
– चौथा लेझर रेट्रो रिफ्लेक्टर अॅरे म्हणजेच LRA. त्यातून बाहेर पडणाऱ्या लेसर किरणांना ते पुन्हा परावर्तित करेल. त्यामुळे विक्रम लँडरचे लोकेशन कळेल.
सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रज्ञान रोव्हरमध्ये चंद्राविषयी माहिती गोळा करण्यासाठी पृथ्वीचे 14 दिवस असतील. चंद्रानुसार फक्त 1 दिवस. कारण चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. पुढील काम 27 किलो वजनाचा प्रज्ञान रोव्हर करणार आहे.