अहमदनगर

Ahmednagar Crime : हॉटेलवर दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत झाले असे….

दारू विक्री करणार्‍या हॉटेलवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या पथकाला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई गजानन एकनाथ गायकवाड (वय 34) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोसपुरी (ता. नगर) गावच्या शिवारात हॉटेल गुडलक येथे हा प्रकार घडला.

अमोल भरत आव्हाड (वय 29), गोरक्षनाथ ज्ञानदेव आव्हाड (वय 45), निलेश जालिंदर आव्हाड (वय 23 तिघे रा. पांगरमल ता. नगर), नवनाथ गंगाधर मोकाटे (रा. इमामपुर ता. नगर) व एक अनोळखी व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील अमोल, गोरक्षनाथ, निलेश या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दीड हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हॉटेल गुडलक येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेले होते.

बेकायदा दारू विक्रीवर कारवाई करत असताना आरोपींनी पथकातील अंमलदार संदीप आव्हाड, दीपक गांगर्डे, भगवान वंजारी यांना कायदेशीर कारवाईस अडथळा निर्माण केला.

तुम्ही आमचे दुकानावर कसे काय आलात? तुम्हाला कोणी हॉटेल चेक करायला सांगितले? तुम्ही येथुन निघुन जा, तुम्ही आमच्यावर रेड का करता? तुम्हाला आमचे काय करायचे ते करा, आम्ही दारूचा धंदा करणारच, तुमचे सारखे लई पोलीस पाहिले.

तुम्ही आमचे हॉटेलवरून निघा’, असे म्हणुन पथकास शिवीगाळ केले. ‘तुम्ही आमचे हॉटेलवर रेड करण्यास आल्यास तुम्हाला पाहूण घेवू’, अशी धमकी देवुन धक्काबुक्की केली.

अमोलने पोलीस अंमलदार आव्हाड यांची शर्टची कॉलर धरून शर्टची दोन बटणे तोडुन खिसा फाडला. पोलिसांकडून सुरू असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button