अहमदनगर

दुसरं लग्न करणं पुरूषाला पडलं महागात; पहिल्या बायकोची पोलिसांत तक्रार

अहमदनगर- पतीने दुसर्‍या महिलेसमवेत लग्न केल्याबद्दल पहिल्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरूध्द फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात पतीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब शिवाजी शिरसाठ असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी मीरा भाऊसाहेब शिरसाठ (रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

 

मीरा यांचे भाऊसाहेब बरोबर 2012 मध्ये लग्न झाले होते. ते आयशर टेम्पो चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मोबाईलमध्ये एका महिलेस समवेतचे काही फोटो डिसेंबर 2021 मध्ये आढळून आले. याबाबत पतीकडे विचारणा केली असता, त्यांनी मारहाण केली. शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली. याबाबत भरोसा सेल येथे तक्रार दाखल केली होती. या ठिकाणी समुपदेशनासाठी चार तारखा झाल्या.

 

नवीन गाडी घेण्यासाठी माहेरावरून पाच लाख रूपये घेऊन ये, असे पतीने सांगून त्रास देण्यास सुरूवात केली. पतीच्या टेम्पोमध्ये आणखी एका महिलेसोबत गळ्यात हार घातलेला फोटो आढळून आला. याबाबत विचारणा केली असता आपण या महिलेबरोबर लग्न केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अखेर पतीने बेकायदेशीरपणे दोन महिलाशी विवाह केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात पहिल्या पत्नीने दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button