अहमदनगर

लग्न होऊन आठ दिवस होत नाही तोच विवाहितेसोबत सासर्‍याने…

अहमदनगर- लग्न झालेल्या विवाहितेला घरात येऊन आठ दिवस होत नाही तोच सासर्‍याने तिला छेडल्याची घटना नगर शहरातील उपनगरात घडली. त्या विवाहितेने कोतवाली पोलिसांत फिर्याद देत सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याची चांगलीच चर्चा उपनगरात रंगली आहे.

 

फिर्यादीचे आठ दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. 19 सप्टेंबर रोजी फिर्यादी राहत्या घरी असताना सासर्‍याने त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच फिर्यादी बेडरूममध्ये केस विचरत असताना सासरा पुन्हा त्यांच्या जवळ आला. त्याने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून विनयभंग केला.

 

सदरची घटना कोणाला सांगू नको म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित विवाहितेने बुधवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात येत सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाबासाहेब इखे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button