अहमदनगर

जिलेबी घेण्यासाठी थांबला अन पावणे दोन लाखांचा लागला चुना..?

पेट्रोल पंप चालकाशी हुज्जत घालत त्यांचे लक्ष विचलित करून त्यांनी कारमध्ये ठेवलेली पावणेदोन लाख रूपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबवली.

केडगावच्या भुषणनगर परिसरातील झेंडा चौकात ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विलास हरिश्चंद्र झांबरे (वय ५८, रा. रासनेनगर, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

झांबरे यांचा कामरगाव शिवारात पेट्रोलपंप आहे. झांबरे घरी येत असताना भुषणनगर येथील झेंडा चौकात रस्त्याच्या कडेला कार लावून जिलेबी घेत होते.

यावेळी एका चारचाकीतून आलेल्या दोघांनी त्यांच्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झांबरे यांनी त्यांची कार पुढे घेतली असता त्यांना कारमधून खाली उतरण्यास सांगून शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

झांबरे पुन्हा कार बसले असता त्यांना कारमधील पुढील डिक्कीत ठेवलेली एक लाख ७२ हजार ८०० रूपयांची रोख रक्कम दिसून आली नाही.

झांबरे यांच्याबरोबर हुज्जत घालणार्याी चारचाकी वाहनातून (एमएच १६ सीक्यू ३२००) आलेल्या दोघांच्या इतर साथीदारांनी रोकड चोरल्याचा त्यांना संशय आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक कासार अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button