ताज्या बातम्या

ITBP Recruitment 2023 : 10वी पास तरुणांना नोकरीची मोठी संधी ! ITBP मध्ये लगेच करा अर्ज, मिळेल 69000 पगार

तुम्ही इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) अंतर्गत नोकरी मिळवू शकता. यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.

ITBP Recruitment 2023 : देशात सध्या मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग सरकारी नोकरीसाठी धरपड करत आहे. अशा वेळी जर तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे.

यासाठी तुम्ही 10वी पास असणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. ही सरकारी नोकरी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) अंतर्गत होणार आहे. यासाठी ITBP ने त्याच्या अधिकृत वेबसाइटवर 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी (ITBP भर्ती 2023) ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

ITBP मध्ये सामील होण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट itbpolice.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ITBP कॉन्स्टेबल भरती 2023 मोहिमेंतर्गत, एकूण 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) गट ‘C’ नॉन-राजपत्रित (नॉन-मंत्रालयीन) पदांसाठी संस्थेमध्ये भरती केली जाईल.

Advertisement

या पदांसाठी अखेरीस निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्समधील स्तर-3 अंतर्गत 21700-69100 रुपये (7 व्या CPC नुसार) वेतनश्रेणी मिळेल. मात्र यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे दरम्यान असावी आणि मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा 10 वी उत्तीर्ण असावी. या अर्जप्रक्रियेत तुमच्या सर्व अटी व नियम तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

ITBP भरतीसाठी अर्ज कसा करावा?

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: जून 27, 2023
अर्ज करण्याची अंतिम मुदत: जुलै 26, 2023

Advertisement

ITBP साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवारांनी मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.

ही वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात

Advertisement

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे दरम्यान असावी. त्यापेक्षा जास्त किंवा कमी असेल तर तो व्यक्ती यासाठी अर्ज करू शकत नाही.

येथे सूचना आणि अर्ज लिंक पहा

ITBP भर्ती 2023 अधिसूचना

Advertisement

ITBP भर्ती 2023 साठी लिंक पहा

ITBP मध्ये निवड झाल्यावर पगार किती मिळेल?

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 21700 ते 69100 रुपये पगार म्हणून दिला जाईल.

Advertisement

Ahmednagar News24

Ahmednagarnews24.com is a Marathi News website, our main objective is to provide Latest Ahmednagar News & Updates In Marathi to Ahmednagarkars from all over the world.

Related Articles

Leave a Reply

Back to top button