ताज्या बातम्या

ऐकावं ते नवलच ! ‘येथे’ मिळतो स्टोन फ्राय, लोक दगड चोखून खातात; एका प्लेटसाठी मोजतात भली मोठी रक्कम

पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की लोक दगडही खातात? ते ही अगदी चोखून ! हो हे खरे आहे. विशेष म्हणजे या लोकांकडे अन्नधान्याची कमतरता नाही,

या जगात जेवढे देश आहेत तेव्हढ्याच खाद्यपदार्थ संस्कृती आहेत. आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की काही लोक साप, विंचू तसेच कीटकही खातात.

पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की लोक दगडही खातात? ते ही अगदी चोखून ! हो हे खरे आहे. विशेष म्हणजे या लोकांकडे अन्नधान्याची कमतरता नाही,

तसेच ते गरिबीतही नाहीत. हे लोक पैसे देऊन देऊन दगड चोखून खातात. स्टोन फ्राय प्लेट साठी तब्बल २०० रुपये मोजावे लागतात.

Advertisement

कुठे मिळते स्टोन फ्राय प्लेट?

आशियातील सर्वात मोठा देश आणि भारताचा शेजारी चीनमधील लोक दगड चोखून खातात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे लोक या स्टोन फ्राय साठी मोठी किंमत मोजतात. चीनमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे. काही लोक ही डिश खास कार्यक्रमात देखील ठेवतात.

काय आहे ही डिश ?

Advertisement

चीनमध्ये या डिशला सुओडीयू म्हणतात. देशभर जरी ही प्लेट प्रसिद्ध असली तरी मध्य चीनमधील लोक ते जास्त खातात. असे म्हटले जाते की ही चीनची पारंपारिक डिश आहे आणि त्याचे अनेक वैद्यकीय फायदे देखील आहेत.

हा पदार्थ चीनच्या हुबेई प्रांतातून आल्याचे सांगितले जाते. खरं तर त्या काळी जेव्हा चिनी नाविक लांब अंतर कापण्यासाठी समुद्रात जात असत,

तेव्हा वाटेत अनेकदा अन्नाचा तुटवडा भासत असे. अशा वेळी ते हे खडक तळून चोखायचे, त्यामुळे त्यास माशांची चव यायची आणि त्यांचे पोटही भरायचे.

Advertisement

ही डिश कशी बनवली जाते?

हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वप्रथम नदीतून खास प्रकारचा रेशीम दगड आणला जातो. हे दगड काळ्या रंगाचे असतात. त्यानंतर ते चांगले स्वच्छ केले जातात,

नंतर तेल, मसाले, सॉस, काळी मिरी आणि थोडे सीफूड घालून चांगले तळले जातात. ते थोडे ओले ठेवले जाते, जेणेकरून दगडांवर हलका रस्सा येईल. थाळी बनवल्यानंतर प्रत्येक दगड चोखून खाल्ला जातो.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button