माहिती वाचुन बसेल धक्का पण होय कोरोना व्हायरस आहे २० हजार वर्षे जुना !

जगात लाखो लोकांचे बळी घेणार्या कोरोना विषाणूचा उगम अलिकडेच चीनमध्ये झाला असावा, असा सर्वांचाच समज आहे. पण, कोरोना विषाणू तब्बल 20 हजार वर्षांहून अधिक जुना असल्याचा धक्कादायक खुलासा एका नव्या संशोधनातून समोर आला आहे.
या विषाणूने यापूर्वीही वेगळ्या स्वरूपात अशाचप्रकारे संपूर्ण जगभर थैमान घातले होते व त्यावेळी देखील असंख्य लोकांचा मृत्यू झाला होता, असेही या संशोधनात आढळून आले आहे.
याबाबतच संशोधन अलीकडेच ‘करंट बायोलॉजी’ या मासिकात प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा उगम 20 हजार वर्षांपूर्वीचा आहे. याबाबतचे अवशेष आधुनिक चीन, जपान आणि व्हिएतनाममधील नागरिकांच्या डीएनएमध्ये सापडल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
आधुनिक लोकसंख्येतील 42 जनुकांमध्ये कोरोना विषाणूचे अनुवांशिक घटक सापडले आहेत. यामध्ये एमईआरएस आणि एसआरएस या विषाणूंचा देखील समावेश आहे. यामुळे मागील 20 हजार वर्षांत अनेक घातक रोगांचा उद्भव झाल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
कोरोना विषाणूसारख्या साथीशी भविष्यात कशाप्रकारे लढता येईल, याची माहिती आपल्याला प्राचीन काळी सापडलेल्या आनुवांशिक घटकांमुळे होऊ शकते, असेही या संशोधनात म्हटले आहे. संबंधित साथीचे आजार मानवी इतिहासाएवढेच जुने आहेत.
यापूर्वीही मानव जातीने अनेक जागतिक महामारीचा सामना केला आहे. या संशोधनासाठी जगभरातील 26 देशांतील 2,500 लोकांची जनुके संशोधनासाठी घेण्यात आली होती. मानवाच्या शरीरात 42 वेगवेगळ्या जनुकांमध्ये कोरोना विषाणूच्या कुटुंबाचे अंश आढळले आहेत.
जवळपास 25 हजार वर्षांपूर्वी आशिया खंडातील लोकांचे पूर्वज पहिल्यांदा कोरोना विषाणूच्या संपर्कात आले होते. संबंधित 42 आनुवंशिक घटक प्रामु‘याने फुफ्फुसांमध्ये आढळतात.
ज्यामुळे कोविड-19 विषाणू फुफ्फुसांसाठी सर्वाधिक घातक ठरत आहे. हे आनुवंशिक घटक सध्याच्या साथीच्या सार्स-कोव्ह-2 या विषाणूच्या थेट संपर्कात येतात, असेही संशोधकांनी म्हटले आहे.