अहमदनगर
जाब विचारण्यासाठी घरी गेले; बाप-लेकांनी लोखंडी पट्टी, लाकडी दांडक्याने मारले

तिघा जणांना बाप-लेकाने लोखंडी पट्टी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. निसार शेख व अश्पाक पठाण (दोघे रा. डेअरी फार्म, यशवंतनगर, भिंगार) जखमी झाले आहेत.
मारहाण करणारे रोहन सकट व त्याचे वडिल भरत सकट (दोघे रा. यशवंतनगर) यांच्याविरूध्द भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सुधीर दिलीप ओहळ (वय 34 रा. यशवंतनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
रोहन सकट याने बदनामी केल्याचा जाब विचारण्यासाठी ओहळ आणि त्यांचे मित्र शेख, पठाण त्याच्याकडे गेले होते. ‘मी बदनामी केलेली नाही, तु माझ्याकडे कसा आला’, असे म्हणत रोहन व त्याचे वडिल भरत यांनी ओहळ यांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.
‘या दोघांना आम्हाला मारण्यासाठी आणले आहेत का’, असे म्हणत ओहळ यांचे मित्र शेख व पठाण यांना लोखंडी पट्टा, लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.