Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : जागरण गोंधळावरून परतताना दुचाकीसह विहिरीत कोसळला, तरुणाचा मृत्यू

Ahmednagar News : जागरण गोंधळावरून परतताना दुचाकीसह विहिरीत कोसळला, तरुणाचा मृत्यू

Ahmednagar News : अपघाताच्या अनेक दुर्दैवी घटना घडताना दिसत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका संपण्याचे नाव घेईना.

काल पारनेरमधील सहा जणांचा बळी घेणाऱ्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.

जागरण गोंधळावरून परतताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत दुचाकीसह पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना राहता तालुक्यातील केलवड शिवारात घडली.

या घटनेत भारत शंकर भडांगे (वय ३२) रा. कवठे कमळेश्वर, ता. संगमनेर या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यासोबत आणखी दोघे असल्याची माहिती मिळाली आहे. ते जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

केलवड ते काकडी विमानतळ या दरम्यान रस्त्याच्या कडेला ही विहीर आहे. या घटनेतील मयत हे या रस्त्याने २२ जानेवारी रोजी रात्री ९ वाजे नंतर केलवड येथील एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमावरुन परत जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेच्या विहिरीचा अंदाज आला नसावा.

त्यामुळे आपल्या दुचाकीसह ते विहिरीत पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी त्याला वर काढले व त्यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल केले होते.

परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी याची दिलेल्या माहितीवरून राहाता पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या घटनेच अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्य मार्गदर्शनाखाली सहायक फौजदा एन. यु. पेटारे करत आहेत.

दरम्यान या दुचाकीस्वाराबरोबर आणखी दोघेजण होते अशी माहिती मिळाली आहे. ते यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments