अहमदनगर
मनपाच्या सभेत आता गुंजणार जन गण मन…’

महानगरपालिकेच्या स्थायी समितीची यापुढील प्रत्येक सभा होण्यापूर्वी ‘जन गण मन…’ हे भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाणार आहे.
दरम्यान याबाबत स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे यांनी अधिकार्यांना नुकत्याच सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार याची अमलबजावणी देखील करण्यात आली आहे. आज महानगरपालिकेचा 2022 -2023 चा अर्थसंकल्पाच्या सभेला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
स्थायी समितीचे सभापती कुमार वाकळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक मुदस्सर शेख,
नगरसेवक गणेश कवडे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका गौरी ननवरे, तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.