अहमदनगर

नदी पात्रातून वाळू उपसा करणारे जेरबंद; 26 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहमदनगर- पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील अवैध वाळूवर कारवाई केली जात आहे. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने खरडगाव (ता. शेवगाव) येथील नाणी नदी पात्रातून विनापरवाना बेकायदेशीर वाळू वाहतूक करतांना जेसीपी डंपरसह दोघांना जेरबंद केले.

 

त्यांच्याकडून करून 26 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शेवगाव तालुक्यात खरडगाव येथील नाणी नदीच्या पत्रातून बेकायदा, विनापरवाना पद्धतीने वाळूची उचलेगिरी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मिटके यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी मिटके यांनी त्यांच्या पथकाला संबंधीत ठिकाणी जाऊन छापा घालण्याचे आदेश दिले.

 

त्यानुसार पथकाने छापा घालून चोरटी वाळू वाहतूक करतांना मिळून आलेल्या आरोपीच्या ताब्यातून 20 लाख रुपये किंमतीचा जेसीबी, तसेच दुसर्‍या आरोपीच्या ताब्यातून 6 लाख 15 हजार किंमतीचा डंपर व तीन ब्रास वाळू असा 26 लाख 15 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला.

 

याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सचिन काकडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशपाक सुलेमान शेख व गणेश चंद्रकांत केदार अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगाव परिसरात होत असलेल्या वाळूतस्करीबाबत बाहेरच्या पोलिस पथकाने येथे येऊन कारवाई केली. मात्र, स्थानिक पोलिसांना याची माहिती नसावी, याबाबत परिसरातील पर्यावरणवादी यांच्याकडून आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button