जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड; आरोपींच्या वकिलांनी वेधले ‘या’कडे लक्ष

येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी सुरू आहे. आरोपींच्यावतीने प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्यासमोर युक्तवाद सुरू आहे.
हत्याकांडातील संजय, जयश्री आणि सुनील जाधव यांची उत्तरीय तपासणी औरंगाबाद येथील घाटी या शासकीय रूग्णालयात करण्यात आली होती. या उत्तरीय तपासणी करताना कायदेशीर तरतुदींचे पालन झाले नसल्याकडे आरोपींच्या वकिलांनी लक्ष वेधले.
संजय जाधव यांच्यावर 19 जखमा करण्यात आल्या होत्या. पोटापासून दोन तुकडे केले होते. जयश्रीच्या अंगावर 26 जखमा होत्या. सुनीलच्या शरीराचे मुंडके, हात, पाय वेगवेगळे तुकडे केलेले होते.
याबाबत डॉ. ठुबे यांनी आधुनिक आणि तीक्ष्ण हत्याराने हे तुकडे केले आहेत, असा अभिप्राय पहिल्या अहवालात नमूद केलेला होता. मृतदेहांची उत्तरीय तपासणी करताना मयतांच्या अंगावरील दागिने काढून तपासणी करावयाची असते.
उलट तपासणीमध्ये जयश्रीच्या अंगावरील दागिने उत्तरीय तपासणीपूर्वी काढले नव्हते. संजय यांच्या हातातील कडेही तसेच असल्याचे मान्य केले. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने विधिज्ञ सुनील मगरे, नितीन मोने, छगन गवई, सिद्धार्थ उबाळे, अरूण चांदणे हे काम पाहत आहेत.