Jio Cheapest Recharge Plan : जिओने सादर केला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटासह मिळणार अनेक फायदे
तुम्हीही जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी जिओकडून सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहक या प्लॅनचा वापर करून पैशांची बचत करू शकता.

Jio Cheapest Recharge Plan : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना दिवसेंदिवस अनेक स्वस्त प्लॅन सादर केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची बचत होऊन त्यांना या स्वस्त रिचार्ज प्लॅनमधून अनेक फायदे देखील मिळत आहेत.
रिलायन्स जिओकडून नुकताच एक स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक मोफत फायदे दिले जात आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे.
रिलायन्स जिओकडून हा सर्वात स्वस्त प्लॅन त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हीही जिओचे प्रीपेड ग्राहक असाल तर हा स्वस्त रिचार्ज प्लॅन तुम्हाला ८४ दिवस अनेक मोफत फायदे देईल. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि अनेक फायदे देण्यात येत आहेत.
जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या ऑफर सादर केल्या जात आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, इंटरनेट डेटा आणि एसएमएसची देखील सुविधा देण्यात येत आहे.
जिओकडून सादर करण्यात आलेल्या रिचार्ज प्लॅनची किंमत ४०० रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या स्वस्त रिचार्ज प्लॅनची वैधता देखील ८४ दिवस म्हणजेच ३ महिन्यांची आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे.
जिओकडून त्यांच्या प्रीपेड ग्राहकांसाठी ३९५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे. या रिचार्ज प्लॅनची मुदत ८४ दिवस देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक ३ महिने हा रिचार्ज प्लॅन वापरू शकतात.
जिओच्या 395 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
तुम्हाला दररोज कमी इंटरनेट डेटा लागत असेल तर तुमच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे. कमी इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी जिओचा 395 चा हा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी चांगला आहे. या प्लॅनमध्ये 6GB डेटा मिळतो.
395 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 1000 एसएमएस देण्यात येत आहेत. तसेच 6GB डेटा देण्यात येत आहे. तसेच हा डेटा संपल्यानंतर तुम्ही 64Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरू शकता. यासोबतच या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळेल.