आर्थिक

Jio Recharge Plans : जिओ वापरकर्त्यांसाठी भन्नाट रिचार्ज प्लॅन ! ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळतील फायदेच फायदे

रिलायन्स जिओने स्वस्त रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत खूप मोठे फायदे मिळणार आहेत.

Jio Recharge Plans : जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कंपनी तुम्हाला स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारे फायदे मिळतील.

यामध्ये कंपनी परवडणाऱ्या प्लॅनसह अधिक वैधता, अधिक डेटा आणि अनेक OTT प्लॅटफॉर्मवर विनामूल्य सब्सक्रिप्शन देते. मात्र जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागेल, कारण ही ऑफर मर्यादित काळासाठीच वैध आहे.

या प्लॅनवर अतिरिक्त फायदे उपलब्ध आहेत

Advertisement

रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी 299 रुपयांच्या रिचार्जवर 7GB अतिरिक्त डेटा देत आहे. तसेच, कंपनी 749 रुपयांच्या Jio प्लॅनवर 14GB अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे.

याशिवाय, 2,999 रुपयांच्या Jio रिचार्जवर, वापरकर्त्याला कंपनीचा अतिरिक्त 21GB डेटा, AJIO वर खरेदीवर 200 रुपये सूट, Netmeds वर 20 टक्के सूट, Swiggy वर 100 रुपये आणि Reliance Digital वर 10 टक्के सूट मिळत आहे. ही ऑफर फक्त 30 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

अतिरिक्त फायद्यांचा लाभ कसा घ्यायचा?

Advertisement

एकदा रिचार्ज केल्यानंतर, अतिरिक्त फायदे पात्र ग्राहकांच्या ‘MyJio’ खात्यात त्वरित जोडले जातील. अतिरिक्त डेटा ‘MyJio’ अॅपमध्ये डेटा व्हाउचर म्हणून जमा केला जाईल आणि वापरकर्त्यांना त्यातून व्हाउचर रिडीम करावे लागेल.

28 ऑगस्ट रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिओच्या मोबाईल नेटवर्कबद्दल बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, त्यांच्या नेटवर्कवर दर महिन्याला प्रत्येक वापरकर्त्याचा डेटा 25GB इतका आहे.

तसेच ते म्हणाले की Jio 5G सेवांवर, 96 टक्के वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देश कव्हर करण्याच्या मार्गावर आहे. महत्वाचे म्हणजे भारतातील दूरसंचार सेवा हाय-स्पीड 5G सेवा देणे सुरू केले आहे. कारण जिओच्या एकूण ग्राहकसंख्येने आता 45 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कंपनी अनेक नवनवीन प्लॅन घेऊन येत असते.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button