बाजारभाव

कांद्यानं केला वांदा; बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत

अहमदनगर- नवीन लाल कांदा महिनाभरात बाजारात येणार असून जुन्या कांद्याला बाजार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू झाला तरी कांदा पिकाचे दर 15 रुपये प्रती किलोच्या पुढे जात नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

 

साधारणपणे मार्च, एप्रिल मे महिन्यांत काढलेला गावराण कांदा शेतकरी बाजार भाव नसल्याने साठवून ठेवतो. आषाढ महिन्यांत आवक मंदावल्यावर बाजार वाढतात त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात काढलेला कांदा साठवून ठेवतो. दोन-तीन महिने कांदा सांभाळल्यावर जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत नवीन कांदा निघत नसल्याने बाजारात देखील आवक मंदावलेली असते, अशा वेळी याकाळात कांद्याला चांगला बाजार मिळतो. परंतु यावर्षी आषाढ महिना संपला तरी कांदा 15 रुपये किलोच्या पुढे गेला नाही.

 

याबाबत पारनेर बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले, सध्या पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 ते 15 रुपये दराने कांदा विकला जात आहे.आषाढ महिन्यांत 17 रुपये किलोच्या पुढे बाजार भेटला नाही. साधारणपणे 15, 16 ऑगस्टनंतर कांद्याचे बाजार भाव वाढू शकतात. तीन-चार महिने संभाळूनही कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यामुळे भांडवल ही गुंंतले व नफाही अडकल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button