Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : नगर तालुका खरेदी विक्री संघावर कर्डीले गटाचे वर्चस्व,एक हाती...

Ahmednagar News : नगर तालुका खरेदी विक्री संघावर कर्डीले गटाचे वर्चस्व,एक हाती सत्ता ! पहा विजयी उमेदवार

Ahmednagar News : नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि.५) दुपारपर्यंत विरोधी महाआघाडीच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

संघाची १७ जागांसाठी १८ फेब्रुवारीला होणारी निवडणुक बिनविरोध झाली आहे. त्यामुळे संघावर पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले गटाची सत्ता आली आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दि. १२ ते १८ जानेवारी या कालावधीत १७ जागांसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.

छाननीत सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. दाखल अर्ज माघारीची मुदत सोमवारी (दि.५) दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत अनेकांनी माघार घेतल्याने १७ जागांसाठी १७ अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

बिनविरोध झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे

सहकारी संस्था प्रतिनिधी मतदार संघ (जागा १०) दत्तात्रय बबनराव नारळे, अशोक दशरथ कामठे, अजिंक्य वाल्मिक नागवडे, संजय अप्पासाहेब धामणे,

भारत गोपीनाथ फालके, संजना विठ्ठल पठारे, डॉ. राजेंद्र सूर्यभान ससे, आसाराम दशरथ वारुळे, मंगेश ठकाजी बेरड, बाबासाहेब सदाशिव काळे.

व्यक्तिगत मतदार संघ (जागा २)
रावसाहेब मारुती शेळके, मिनीनाथ एकनाथ दुसुंगे.
महिला राखीव मतदार संघ (जागा २)
मंगल लक्ष्मण ठोकळ, मीना बाळासाहेब गुंड.
इतर मागास प्रवर्ग (जागा १)- उत्कर्ष बाळासाहेब कर्डिले.
अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग (जागा १)- जीवन भाऊसाहेब कांबळे.
वि.जा.भ.ज. प्रवर्ग (जागा १) – संतोष अर्जुन पालवे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments