अहमदनगर

Ahmednagar news: केडगाव हत्याकांड ‘यांची’ सरकारी वकील म्हणून नियुक्ती

Ahmednagar news :  मनपा पोटनिवडणुकीच्या वादातून केडगाव येथे झालेल्या शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याच्या विधी व न्याय विभागाने याबाबत आदेश दिले आहेत. केडगाव येथे 7 एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे.

मागील महिन्यात कोतकर व ठुबे कुटुंबियांनी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण केले होते. या उपोषणाची दखल सरकारच्यावतीने घेण्यात आली.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी या प्रकरणात अ‍ॅड. मिसर यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. 12 एप्रिल रोजी विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरूडे यांनी मिसर यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button