Kia Carens : किआच्या या एसयूव्हीने Maruti, Toyota ची केली बोलती बंद ! शक्तिशाली फीचर्ससह आहे पहिल्या क्रमांकावर; पहा किंमत
Kia Carens 216 लीटरची मोठी बूट स्पेस देते. सुरक्षेसाठी यात सहा एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, EBD सह ABS आहेत.

Kia Carens : भारतीय बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होतात. सध्या देशात कार खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. असे असताना बाजारात अनेक कंपन्या नवनवीन फीचर्ससह कार लॉन्च करत आहेत.
यामध्ये मोठ्या कुटुंबांसाठी लोक 7 सीटर फॅमिली कार खरेदी करत असतात. अशा वेळी या सेगमेंटमधील डॅशिंग कारपैकी एक म्हणजे Kia Carens. आम्ही तुम्हाला या कारच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल सांगणार आहे.
Kia Carens 1.5L पेट्रोल इंजिन
Kia Carens 1.5 लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यात 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील मिळतो. हे शक्तिशाली इंजिन 160 PS ची उच्च शक्ती आणि 253 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाजारात या कारची सुरुवातीची किंमत 12.06 लाख रुपये एक्स-शोरूम ते 21.73 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.
10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
या SUV कारमध्ये अलेक्सा कनेक्टिव्हिटी, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, इलेक्ट्रिक वन-टच फोल्डिंग यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. Kia Carens मध्ये सहा आणि सात सीट दोन्ही पर्याय आहेत. यात डिझेल इंजिनचा पर्याय देखील आहे.
Kia Carens मध्ये सुरक्षिततेसाठी सहा एअरबॅग्ज
Kia Carens ला सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी वैशिष्ट्ये आहेत. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन आहेत.
Kia Carens च्या एकूण 8,047 युनिट्सची विक्री
या कारची बाजारात मारुती XL6, Toyota Innova Hycross आणि Maruti Invicto सोबत स्पर्धा आहे. जून 2023 मध्ये Kia Carens च्या एकूण 8,047 युनिट्सची विक्री झाली आहे. तर जून 2022 मध्ये ही संख्या केवळ 7,895 युनिट्स होती. कंपनी त्यात डिझेल आणि पेट्रोल व्हर्जन ऑफर करते.
Kia Carens ला 216 लिटरची मोठी बूट स्पेस मिळते
कारमध्ये आठ मोनोटोन कलर पर्याय उपलब्ध आहेत. Kia Carens 216 लीटरची मोठी बूट स्पेस देते. कारला प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी, लक्झरी (O) आणि लक्झरी प्लस असे सहा ट्रिम्स मिळतात.
दरम्यान, दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी Kia च्या या कारला सेकंड रो सीट इलेक्ट्रिक वन-टच फोल्डिंग मिळते. यात सुमारे 64 रंगांमध्ये अॅम्बियंट लाइटिंग, हवेशीर फ्रंट सीट्स आणि सिंगल-पेन सनरूफ यासारखी आक्रमक वैशिष्ट्ये आहेत. कारला त्याच्या सेगमेंटमध्ये जास्त मागणी असलेली कार आहे. मोठ्या प्रमाणात कंपनी इतर देशांमध्ये निर्यात करते.