अहमदनगर
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले; कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल

कोपरगाव तालुक्यातील वारी येथील अल्पवयीन मुलगी जातेगाव टेंभी ता.वैजापूर येथील आरोपीने बेकायदेशीररित्या पळवली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी मुलीचे वडील हे वारी येथील रहिवासी असून त्यांचा शेत मजुरीचा व्यवसाय आहे. ते पत्नी, आई, वडील, व सतरा वर्षीय लहान मुलीसह दोन मोठ्या भावंडासह राहत होती. रविवार दि 17 एप्रिल रोजी दुपारी जातेगाव टेंभी येथील आरोपीने मुलीला प्रलोभन दाखवून अज्ञात करणासाठी पळवून नेली आहे.
आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही. तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.