अहमदनगर

अल्पवयीन मुलीला पळविले

मैत्रिणीकडून जावुन येते असे म्हणून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी घरी परत आलीच नाही.

या प्रकरणी तिच्या आईने येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावेडी उपनगरातील राहणार्‍या फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी बुधवार, 23 मार्च, 2022 रोजी रात्री मैत्रिणीकडे जावुन येते, असे घरी सांगून गेली होती.

ती घरी परत न आल्याने घरच्यांनी तिचा शोध घेतला. ती मिळून न आल्याने अखेर पोलिसांंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस त्या मुलीचा शोध घेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button