अहमदनगर
अल्पवयीन मुलीला पळवून नेले अन् अत्याचार केला; पुढे…

शहरातील एका उपनगरात राहणार्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेहत तिच्यावर अत्याचार करण्यात आला.
तोफखाना पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली असून पळवून नेणार्या मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याने पीडित मुलीच्या पालकांनी 11 जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरण करणार्या मुलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिची सुटका केली. पळवून नेणार्या मुलाला ताब्यात घेतले.
दरम्यान या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरण, पोक्सो कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव अत्याचाराचे कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदविला आहे.