अहमदनगर

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीस परजिल्ह्यातून अटक

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला ठाणे जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेण्यात आले आहे.

सुनिल भाऊसाहेब वैरागर (वय 21) व्यवसाय- मजुरी रा. राजवाडा, सोनई असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस पथकास गोपनीय बातमी मिळाल्याने अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा इसम हा अल्पवयीन मुलीसह अंबरनाथ पोलीस ठाणे, जिल्हा ठाणे येथे थांबलेला आहे.

तातडीने पथकातील अंमलदार यांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी सुनिल भाऊसाहेब वैरागर (वय 21) व्यवसाय- मजुरी रा. राजवाडा, सोनई यास अल्पवयीन मुलीसह अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतून अटक करण्यात आली.

त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या जबाबावरुन आरोपीवर वाढीव कलम लावण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button